Massage

'EduCulture' या शैक्षणिक संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे.....

❬❬ ब्लॉग आवडला तर Like करायला विसरू नका ❭❭




सर्व प्रशिक्षणार्थींना नमस्कार 🙏, सर्वांचे प्रशिक्षण झालेले आहे आणि आता प्रकल्पावर काम चालू आहे. प्रकल्प पूर्ण करीत असताना आपण निवडलेल्या प्रकल्पावर आपल्याच शाळेमध्ये प्रत्यक्ष कृती करुन नंतरच प्रकल्पाचे लेखन करणे अपेक्षित आहे. WPS office, Office Suite, Docs यापैकी कुठल्याही ॲप्लिकेशनमध्ये फाइल ओपन करा. फाईलची रचना समजायला खूप सोपी आहे प्रत्येक मुद्द्यासाठी दोन बॉक्स आहेत त्यातील पहिल्या बॉक्समध्ये प्रश्न किंवा मुद्दा दिला आहे, दुसऱ्या बॉक्समध्ये प्रश्नाचे उत्तर किंवा मुद्द्याचे स्पष्टीकरण आपणास लिहावयाचे आहे, याप्रमाणेच सर्व मुद्यांसाठी स्पष्टीकरण तसेच प्रकल्प पूर्ण केल्याच्या कृती पायऱ्या व त्याचे स्पष्टीकरण भरून झाले की ती फाईल जतन करून ठेवावी आणि अविरत संकेतस्थळावर upload file या बटनावर click करून सदरील फाईल select करून upload म्हणावे बस ... झाला आपला प्रकल्प पूर्ण👍
प्रकल्प पूर्ण करीत असताना मराठी टायपिंग करताना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागते माझ्यामते प्रकल्प लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर पूर्ण करण्याऐवजी मोबाईलवर पूर्ण करणे सोपे जाणार आहे परंतु मोबाईलवर मराठी टायपिंग करत असताना वेळ खूप लागतो इतर कुठल्या मराठी टायपिंगच्या पद्धतींचा वापर करण्याऐवजी google voice type चा वापर केल्यास आपले काम अगदी सोपे होणार आहे. ज्या वेगाने आपण बोलतो त्या वेगाने टाइपिंग करण्याची क्षमता google voice type मध्ये आहे म्हणजेच टायपिंग करण्याचे कौशल्य आपल्याकडे नसेल तरीही हवे तेवढे टायपिंग अगदी सहज जमणार आहे आपण करायची गरज नाही फक्त बोलायचे टायपिंग आपोआप होणार... आपण जो संदेश वाचत आहात तोसुद्धा google voice typing माध्यमातूनच तयार केला आहे आणि तोही अगदी कमी वेळामध्ये. आपल्यापैकी बऱ्याच जणांना या पद्धतीची माहिती असेल परंतु काहीजणांना ही पद्धत नवीन असेल अशांसाठी पुढे एक लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ बघून आपण आपल्या मोबाइलमध्ये आवश्यक सेटिंग करून घेऊन या पद्धतीचा वापर करू शकतात आणि कुठेही बसल्याबसल्या आपल्या मोबाइल मध्येच आपला प्रकल्प पूर्ण करू शकतात video बघण्यासाठी खालील लिंक क्लिक करा  SettingVideo बघा
Tab

0 comments:

 
Top