कल चाचणी कल चाचणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न राज्यातील सर्व माध्यमिक शाळांतील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय चाचणी (कल चाचणी) घेण्यात येईल.या माध्यमातून त्यांना उच्च शिक्षण अथवा व्यवसायासाठी योग्य क्षेत्राची निवड करण्यास सहाय्य करुन आवश्यकतेनुसार वैयक्तिक मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात येईल. सन २०१५-१६ पासून सुरु करण्यात आलेल्या कल चाचणीकरिता वेबसाईट सुरु झालेली आहे त्यासाठी प्रत्येक शाळेतील सर्व संगणकांचे ऑनलाईन सर्वेक्षण दिनांक ९ डिसेंबर,२०१५ ते २३ डिसेंबर,२०१५ या कालावधीत करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेत हे सर्वेक्षण व कलचाचणीची जबाबदारी एका शिक्षकावर सोपविली आहे, त्या शिक्षकाने माहिती भरावी. उद्देश :१)इयत्ता दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला व्यवसाय मार्गदर्शन सेवेद्वारे शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रांची निवड करण्यास मार्गदर्शन करणे. २) विद्यार्थी व पालक यांना विविध शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रांची माहिती देऊन जाणीव जागृती करणे. संगणक सर्वेक्षण माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा कलचाचणी Presentation साठी येथे क्लिक करा Inspection Presentation साठी येथे क्लिक करा Website ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. कल चाचणी कल चाचणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न राज्यातील सर्व माध्यमिक शाळांतील इयत्ता ... Read more »
दीपावली शुभेच्छा "Educators" तर्फे सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 💐 💐 💐 💐 दीपावली शुभेच्छा "Educators" तर्फे सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 💐 💐 💐 💐 Read more »
दसरा शुभेच्छा दसरा शुभेच्छा * आपट्याची पाने जुळवतात मने दस-याच्या प्रेमळ शुभेच्छा पाठवल्यायत गोड मनाने स्विकार व्हावा त्याच्या मोठ्या मनाने. दस-याच्या शुभेच्छा! *उत्सव आला विजयाचा...दिवस सोने लुटन्याचा...नवे जुने विसरुन सारे,फ़क्त आनंद वाटन्याचा...तोरण बांधू दारी,घालू रांगोळ अंगणी.. उधळण सोन्याची,जपु नाती मना-मनाची विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा *स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा दसरा सण आला. विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला. विजयादशमीच्या शुभेच्छा! *रम्य सकाळी, किरणे सोनेरी, सजली दारी तोरणे ही साजीरी, उमलगे आनंद मनी, ... जल्लोष हा विजयाचा हसरा रम्य उत्सव प्रेमाचा तुम्हांस सुखसमृद्धी देवो हा दसरा!! *आपणांस व आपल्या संपुर्ण परिवारास दसरा-विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!! दसरा आणि हिंदू संस्कृती आश्विन शुद्ध दशमीच्या दिवसाचे महत्त्व हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण असे आहे. पांडवांचा वनवास संपण्याचा जसा हा दिवस मानला जातो,त्याच प्रमाणे दुष्ट रावणाशी प्रभू रामचंद्रांनी निकराचे युद्ध करून त्याचा वध केल्यामुळे राम विजयाचा दिवसही हाच मानला जातो.आदिमाता दुर्गादेवीने नवमी दिवशी अत्याचारी महिषासुराचा वध केल्यामुळे देवीच्या विजयोत्सवाचा दिवस म्हणूनही या दिवसाचे धार्मिक महत्त्व फार मानले जाते. या शुभदिनी आपट्याची पाने लुटून ती सोने म्हणून वाटण्याची प्रथा आहे. या संबंधी एक मनोरंजक कथा आहे. प्राचीन काळी कौत्स नावाचा एक ब्राह्मण पुत्र वरतंतू ऋषींकडे विद्या संपादन करण्यासाठी गेला. त्याने गुरूंकडून चौदा विद्या संपादन केल्यावर तत्कालीन रीतीनुसार गुरुदक्षिणा मागण्याची त्याने गुरूंना विनंती केली. गुरू काहीही मागेनात. शिष्याने प्रथेनुसार काही तरी मागाच म्हणून गुरूंमागे सारखा लकडा लावला. गुरू संतापले आणि त्यांनी चौदा विद्यांचे अद्यापन मूल्य म्हणून चौदा कोटी सुवर्ण मुद्रा मागितल्या.शिष्य इतके सोने कुठून आणणार? तथापि, गुरूंना दक्षिणा आणून देण्याचे वचन देऊन तो रघुराजाकडे चौदा कोटी मोहरांचे दान मागण्यासाठी गेला. रघुराजाने नुकतेच विश्वजित यज्ञात सर्व द्रव्य दान केले होते; पण दारी आलेल्या याचकाला रिक्त हस्ते परत पाठविणेही राजाला लांछनास्पद वाटल्यामुळे त्याने इंद्रावर स्वारी करून सोन्याच्या मोहरा मिळविल्याचा इरादा केला. ही गोष्ट इंद्राला समजताच त्याने कुबेराकरवी अयोध्या नगरीबाहेरील आपट्याच्या (शमी) झाडावर सुवर्ण मोहरांचा पाऊस पडला. त्यामुळे इंद्रावर स्वारी करण्याचा बेत रहित करून राजाने त्या मोहरा कौत्साला दान केल्या. कौत्साने त्या गुरूंना अर्पण केल्या. गुरूंनी मोजून चौदा कोटी मोहराच घेतल्या.उरलेल्या मोहरांचे काय करावे हा पेच निर्माण झाला. दान केलेल्या मोहरा परत घेणे राजालाही शक्य नव्हते. अशा परिस्थितीत कौत्साने त्या मोहरा अयोध्यानगरीतील प्रजेकडून लुटविल्या. याच मोहरांचे प्रतीक म्हणून दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करून शमीची पाने लुटण्याची प्रथा सुरू झाली. महिषासुराचा वध करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवांच्या शक्तिरूपाने दुर्गादेवीचा अवतार धारण केला, अशी कल्पना रूढ झाल्यामुळे क्षत्रिय लोक देवीच्या या उत्सवात अधिक उत्साहाने भाग घेत असत. दसरा हा पौरुषाचे किंवा वीर वृत्तीचे दर्शन घडविणारा क्षण असल्यामुळे क्षात्र महोत्सव म्हणून हा सन साजरा केला जात असे.विजयादशमीचा हा दिवस वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक सर्वोत्कृष्ट मुहूर्त म्हणून पूर्वीचे राजे आपल्या सैनिकांसह नव्या मुलूखगिरीवर जात असत. आजही कोणतंही नवीन काम या मुहूर्तावर करणं शुभ मानलं जातं. यामागे धार्मिक कारण तर आहेच, शिवाय मानसशास्त्रीय कारण असं की, या वेळी पावसाळा संपत आल्यामुळे प्रवासात विशेष अडचणी येत नाहीत. सर्व मार्ग खुले झाल्यामुळे बिनधास्तपणे कुठेही जाता येते. गावसीमेत बंदिवान झालेले सर्व मानवप्राणी बंधमुक्त झाल्याने शेतकरीवर्गही खुशीत असतो. सर्वांनाच निसर्गाकडून चालू लागण्याची प्रेरणा व उदंड उत्साह प्राप्त होता. "दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा!'असे उद्गार निघतात ते या अनुकूलते मुळेच. क्षात्रवृत्तीची जोपासना करण्यासाठी सीमोल्लंघन करण्याचा संदेश देणारा हा सण.आजच्या विज्ञान युगात जुन्या, बुरसटलेल्या विचारांच्या सीमारेषांचे उल्लखंन करण्याची खरी गरज आहे. बदलत्या जगातील ज्ञान प्राप्त करून वैज्ञानिक प्रगती साधण्यात खरा पुरुषार्थ सामावलेला आहे. सतत उद्यमशील राहून, उद्योगाच्या नाना क्षेत्रांत धडाडीने प्रवेश करून स्वतःच्या व पर्यायाने देशाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी धडपडण्यातच क्षात्रतेजाचं खरं दर्शन घडणार आहे. मानापनाच्या खोट्या कल्पना झुगारून देऊन हुंड्यासारख्या असुरी प्रथा व त्यासाठी स्त्रीचा होणारा अघोरी छळ यातून तिची सुटका करून, तिच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झटण्यातच पुरुष जातीचं खरं कल्याण आहे. शक्तिदेवीच्या उपासनेचा हाच खरा अर्थ आहे. मुलगी होणार म्हणून केली जाणारी भ्रुणहत्त्या थांबविण्यानेच आदिशक्तीची खरी आराधना केल्याचे पुण्य पदरी पडणार आहे. अज्ञान, दारिद्य्र, विषमता, जातीयता,फुटिरता आणि धर्मांधतेचे तट ओलांडून जीवनातील खऱ्या सुखाचं सोनं आपल्याला लुटायच आहे. शमी-आपट्यांच्या पानांच्या प्रतीकातून आज आपल्याला हाच अर्थ अभिप्रेत असला पाहिजे. शमी एकवीस पत्रींमध्ये समावेश असणारी शमी गणपती, हरितालिका वगैरेच्या पूजांमध्ये वापरली जातेच, पण शमीचे झाड औषधीसुद्धा असते. शमीचे झाड मध्यम आकाराचे, छोटी छोटी पाने असणारे आणि काटेरी असते. याची पाने वर्षभर हिरवीगार असतात. शमीला शेंगा येतात. प्रत्येक शेंगेमध्ये १० ते १२ बिया असतात. शमीची झाडे जमिनीची सुपीकता वाढवतात म्हणून शेतामध्ये लावण्याची पद्धत आहे. शेंगा कच्च्या असताना त्यांची भाजीही केली जाते. विशेषतः पंजाब, मारवाड वगैरे प्रदेशात ही भाजी करण्याची पद्धत दिसते. हाती घेतलेल्या कामात यश मिळावे यासाठी शमीच्या झाडाची पूजा केली जाते. काही प्रदेशात दिवाळीच्या दिवशी रात्रभर शमीची पाने भिजवून ठेवलेल्या पाण्याने स्नान करण्याचाही प्रघात दिसतो. आयुर्वेदात शमीच्या झाडाचे गुणधर्म याप्रमाणे सांगितलेले आहेत. शमी तिक्ता कटुः शीता कषाया रोचनी लघुः। कफकासभ्रमश्वास-कुष्ठार्शक्रिमिजित् स्मृता ।। … भावप्रकाश शमीचे झाड (विशेषतः साल व पाने) कडू, तिखट व तुरट रसाचे, शीतल स्वभावाचे असते. तोंडाला चव नसणे, मूळव्याध, जंत या पचनसंस्थेशी संबंधित विकारांवर शमी उपयोगी असते. तसेच ती रक्तशुद्धिकर असल्याने त्वचाविकारांवर उपयोगी पडते. शमीची पाने भिजत घातलेल्या पाण्याने स्नान करण्यामागे त्वचारोगांचा प्रतिबंध, त्वचारोगांवर उपचार हा हेतू असतो. शमी कफदोषशामक असल्याने खोकला, दमा या त्रासांवरही उपयुक्त असते. शमीची साल विषघ्न असते, विशेषतः विंचवाच्या दंशावर उतारा म्हणून शमीच्या सालीचा लेप लावण्याचा फायदा होतो. शमी पित्तशामक असल्याने भ्रम म्हणजे चक्कर येत असताही उपयोगी असते. शमीला शिवाफला, ईशानी, शंकरी, मांगल्या, पापनाशिनी अशी पर्यायी नावे आहेत. या पर्यायी नावांवरून शमीची उपयुक्तता लक्षात येऊ शकते. “दोषान् शमयति इति शमी’ अशी शमी शब्दाची व्याख्याही केलेली आहे. अशा प्रकारे दसऱ्याच्या निमित्ताने शमी वृक्षाशी संपर्क यावा हाच हेतू असल्याचे दिसते. पूर्वीच्या काळी जंगलात शमीची अनेक झाडे असत, सध्या मात्र शमीचे पूर्ण वाढ झालेले झाड बघायला मिळणे अवघड होत चालले आहे. शमी जपणारे खेजरली वृक्षसंवर्धनासाठी कोणे एके काळी या गावातील लोकांनी केलेल्या बलिदानाची गोष्ट सांगितल्यावर वृक्षसंवधर्ननाचे महत्त्व कोणालाही सहज पटावे. शमीच्या अनेक झाडांचे प्राणपणाने संवर्धन केल्यामुळे जोधपूरजवळील एका गावाला खेजरली असे नाव पडले आहे. राजस्थानमध्ये शमी वृक्षास खेजडी या नावाने संबोधले जाते.दसऱ्याच्या दिवशी तेथे शमी वृक्षाची पूजा करतात. जोधपूरपासून 25 किलोमीटर दूर अंतरावर खेजरली गाव आहे. गावात मोठ्या आकाराचे व अतिशय प्राचीन (200 वर्षांपेक्षाही जुने) असे खेजडी वृक्ष आढळून येतात. खेजडी अर्थात शमी या वृक्षाचे शास्त्रीय नाव Prosopis cineraria असे आहे.खेजरली गावात प्रामुख्याने विश्नोई समाजाचे लोक राहतात व त्यांचे गुरू श्री जांभेश्वरजी यांनी घालून दिलेल्या 29 नियमांचे कडक पालन करतात. या नियमांपैकी एक प्रमुख नियम वृक्ष व वन्यजीव संरक्षणाचा आहे. खेजडी वृक्षांबाबतचा खेजरली गावातील इतिहास अत्यंत महत्त्वाचा व स्फूर्तिदायक असा आहे. सन 1730मध्ये जोधपूरचे तत्कालीन महाराज श्री. अभयसिंहजी यांनी त्यांच्या सैन्यास त्यांचा राजवाडा बांधण्यासाठी चुना तयार करता यावा यासाठी खेजरली गावातून झाडे तोडून आणण्याचे फर्माविले. या वृक्षतोडीस स्थानिक विश्नोईंनी विरोध दर्शविला. 84 गावांतील अनेक विश्नोईंनी या महत्त्वाच्या कार्यास सामूहिक पाठिंबा दर्शविला. सैनिक मात्र खेजडीची झाडे तोडण्याबाबत आग्रह धरू लागले. तेव्हा विश्नोई पुरुष व महिलांनी झाडांना चक्क मिठ्या मारल्या व पाहता पाहता 363विश्नोई वृक्षसंवर्धनार्थ धारातीर्थी पडले. त्यानंतर मात्र वृक्षतोड थांबविण्यात आली. वृक्षसंरक्षणाचे जगातील असे आगळेवेगळे उदाहरण खेजरली या गावामध्ये पाहावयास मिळते. खेजरली येथे "राष्ट्रीय पर्यावरण शहीद स्मारक' आहे. या तीन ते चार एकर क्षेत्रामध्ये भरपूर पक्षी व झाडे आहेत. येथील शमी वृक्ष वाचविण्याच्या लढ्यात धारातीर्थी पडलेल्या अमृताबाईंचे स्मारक पर्यावरण रक्षणाची आणि वृक्षसंवर्धनाची स्फूर्ती देत राहते. आपणही या गावकऱ्यांकडून वृक्षसंवर्धनाची प्रेरणा घ्यायला पाहिजे. बहुगुणी आपटा आपट्याचे झाड सर्वांना ऐकून, वाचून माहिती असते, पण फार थोड्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले असते. दसऱ्याला सोनं म्हणून आपट्यांची पानं वाटायची असतात, याचे ज्ञान सगळ्यांना असते; पण क्वचितच कोणी खऱ्या आपट्याची पाने वाटत असतील! याचे कारण कांचनाच्या विविध जातींशी असलेले त्यांचे साम्य. बिचाऱ्या कांचनाच्या झाडांचे बेसुमार खच्चीकरण, पर्यावरणाची हानी, कचरा समस्या आणि चुकीच्या आणि कालबाह्य समजुतीवर आधारलेली ही घातक प्रथा कमी होत चालली आहे, ती पूर्णपणे बंद होण्याची आवश्यकता आहे. संस्कृतमध्ये "वनराज' म्हणून गौरविला गेलेला हा वृक्ष शततारका नक्षत्राचा आणि कुंभ राशीचा आराध्यवृक्ष मानला गेलाय. दसऱ्याला त्याची रोपे वाटावीत, लागवड करावी, फार तर पूजाही करावी. आपट्याचे अश्मंतक हे नाव दोन अर्थांनी महत्त्वाचे आहे. अश्मंतक म्हणजे दगडाचा, खडकाचा नाश करणारा. त्याची मुळे जमिनीत खोलवर जातात. खडकाच्या फटीत शिरून वाढतात, कालांतराने फटी मोठ्या होऊन खडक दुभंगतात, अक्षरशः फुटतात! त्यामुळे खडकाळ, मुरमाड, उघड्या, बोडक्या टेकड्यांवर आणि माळांवर वनीकरणासाठी हे एक आदर्श झाड आहे. अश्मंतक याचा दुसरा अर्थ "मूतखडा (किडनी स्टोन) होऊ न देणारा किंवा तो जिरवणारा, मूत्रावाटे बाहेर काढण्यास मदत करणारा होय.' धन्वन्तरी निघण्टूमध्ये आणखी औषधी उपयोग असे दिले आहेत. अश्मनंतकः कषायस्तु हिमः पित्तकफापहः। मधुरः शीतसंग्राही दाहतृष्णाप्रमेहजित् ।। पित्त आणि कफदोषांवर गुणकारी; दाह, तृष्णा आणि प्रमेह यांवर विजय मिळवणारा! साल, पाने, शेंगा आणि बिया औषधात वापरतात. उपयुक्त आणि टिकाऊ आपट्याचे लाकूड मजबूत आणि टिकाऊ असते. पण झाडे लहान आणि वेडीवाकडी वाढणारी असल्यामुळे त्याचा उपयोग फक्त शेतीची अवजारे, हत्यारांचे दांडे इ. तयार करण्यासाठी होतो. उष्मांक मूल्य (कॅलॅरिक व्हॅल्यू) भरपूर असल्यामुळे सरपण, इंधन म्हणून ते फारच चांगले असते. त्याच्या राखेमध्ये लोह, चुना, पोटॅश, मॅग्नेशियम, गंधक, सोडियम व स्फुरद इत्यादींची संयुगे असतात. (कृषी ज्ञानकोश खंड 2 रा) त्यामुळे ती खत म्हणून वापरण्यास चांगली असते. जनावरांना, विशेषतः शेळ्यांना याचा पाला पौष्टिक चारा म्हणून उपयोगी पडतो. तंतुमय सालीपासून मजबूत व टिकाऊ दारे बनवतात. पानांचा उपयोग तेंदुपत्तीप्रमाणे बिड्या तयार करण्यासाठीही करतात. गावाच्या सीमेवर आणि शेताच्या बांधावर ही झाडे लावावीत, असे जुन्या ग्रंथात सांगितले आहे. झाडे खूप वर्षे जगणारी, तोडली तरी पुन्हा फुटणारी, मुळे खोल जाणारी असल्यामुळे हद्दी निश्चित राहतात. छोटेखानी झाडांमुळे पिकांना सावलीचा त्रास तर होत नाहीच, उलट जमिनीचा कस वाढविण्यास त्यांचा उपयोग होतो. आपट्याच्या मुळांवर नत्रस्थिरीकरण करण्याच्या करम्याच्या गाठी असतात. संस्कृतमध्ये आपट्याला कितीतरी नावं आहेत - वनराज, चन्द्रक, आम्लपत्रक, युग्मपत्र, मालुकापर्ण, कुद्दाली इत्यादी. इतर काही भाषांतली नाव अशी ः हिंदी - अष्टा, कचनाल, घिला, झिंझोरी; गुजराती - असुंद्रो ः बंगाली - बनराज, बनराजी; कन्नड - औप्टा, बन्ने, आरेपत्री; तमीळ - अराईवत्ता, आरेका; तेलगू - आरी, आरे. वनस्पतीशास्त्रीय नाव आहे बाउहिनिया रेसिमोसा. बाऊहिनिया हे प्रजातीनाम बाउहिन नावाच्या दोन वनस्पतीशास्त्रज्ञ बंधूच्या स्मरणार्थ दिलं असून कांचनाच्या सर्व जातींचा समावेश त्यात केला जातो. रेसिमोसा म्हणजे विशिष्ट प्रकारचा फुलांचा तुरा येणारे झाड. त्यात फुले देठाकडून टोकाकडे उमलत जाणारी असतात. बहावा, चिंच, गुलमोहर यांच्या कुळातला हा वृक्ष आहे (फॅमिली सिसालपिनेसी). उन्हाळ्यात फुलणारा आपट्याचा वृक्ष 2 ते 5 मीटर उंच वाढतो, कित्येक वेळा झुडूपवजा आणि वेडावाकडा वाढलेला दिसतो. तो पानझडी असली तरी जास्त पावसाच्या प्रदेशात पानगळ अल्पकाळासाठी होते. बुंधा 5 ते 25 सें.मी.व्यासाच असून साल काळसर तपकिरी रंगाची, खडबडीत, भेगाळलेली दिसते. कात्रज घाटातल्या एका वृक्षाच्या खोडावर मोठे अणकुचीदार काटे पाहायला मिळाले. फांद्यांचे शेंडे बहुधा खाली वाकलेले (ड्रूपिंग) असतात. खोडा- फांद्यांची आंतरसाल गडद गुलाबी दिसते. पाने एकांतरित, साधी, दुभागलेली, लांबीपेक्षा रुंदीला जास्त (2 - 5 ु 3 - 6 सें.मी.), चामट (कोरियारियस) वरच्या बाजूला गुळगुळीत हिरवीगार तर खालच्या बाजूने फिक्कट आणि लवयुक्त असतात. तळापासून निघालेल्या 7 ते 9 शिरा स्पष्ट, उठावदार दिसतात. फुलण्याचा हंगाम उन्हाळ्यात (मार्च - जून) असून फुलोरे (मांजिऱ्या, रेसीम्स) डहाळ्यांच्या अग्रभागी आणि पानांच्या देठाजवळही येतात. फुले लहान (1 ते 1.5 सें. मी.) हिरवट - पिवळसर - पांढरी, पाच निमुळत्या पाकळ्यांची असतात. कळ्या लांबट, टोकदार दिसतात. पुकेसर 10 असून ते सुटे, सूक्ष्म आणि केसाळ असतात. पावसाळ्यात वीतभर लांबीच्या चपट्या, वाकड्या, हिरव्या शेंगा झाडावर दिसू लागतात, त्या कित्येक महिने झाडावर राहून पुढच्या उन्हाळ्यात पिकून काळ्या होतात. प्रत्येक शेंगेत 12 ते 20 काळ्या, चपट्या लंबगोल बिया असतात. बिया सहजपणे रुजून रोपे तयार होतात. आपट्याची झाडे भारतात सर्वत्र, अगदी आसेतूहिमाचल पाहायला मिळतात. जंगलात वाढतात आणि लावलीही जातात. पुणे जिल्ह्याच्या मावळ भागात (पर्जन्यमान 1000 ते 2000 मि. मी.) विपुल प्रमाणात झाडं आहेत. बाजी पासलकर जलाशयाच्या काठावरील "इको- व्हिलेज'मध्ये कितीतरी छान वाढलेली झाडे पाहायला मिळतात, तर मध्य प्रदेशातील राजस्थान सीमेवरील राजगढ जिल्ह्यातील निमवाळवंटी प्रदेशातही (पर्जन्यमान 250 ते 500 मिमी) ती मोठ्या संख्येने आढळतात. रोपवाटिकामधून रोपे मिळू शकतात. कोणत्याही हवामानात, कसल्याही प्रकारच्या जमिनीत वाढू शकतात. जमिनीची धूप थांबवण्यासाठी ही झाडे मुद्दाम लावली जातात. त्याच्या मुळांना फुटवे (रूट सकर्स) येतात, त्यांच्या रूपाने शाकीय पुनरुत्पादन घडून येते. अत्यंत उपयोगी, बहुगुणी अशा या वृक्षकाची लाीगवड वनशेती आणि ऊर्जालागवडीसाठी (एकसुरी लागवड टाळून) सर्वत्र आवर्जून करावी. उद्यानात, छोट्या परसबागेत, रस्ता दुभाजकांमध्ये, शेताच्या कुंपणावर आणि बांधावर, कॅनालच्या बाजूने लावण्यासाठी अश्मंतक हा एक उत्तम "वनराज' आहे. Pages: 1 2 3 4 5 6 दसरा शुभेच्छा दसरा शुभेच्छा * आपट्याची पाने जुळवतात मने दस-याच्या प्रेमळ शुभेच्छा पाठवल्यायत गोड मनाने स्विकार व्हावा त्याच्या मोठ्या मनाने. दस-... Read more »
श्रीगणेशाची पूजा श्रीगणेशाची पूजा आपल्या सर्वांच्या सोईसाठी श्रीगणेशाची पूजा पाठवीत आहे तरी ज्यांच्या कडे गुरूजी उपलब्ध होत नाहीत त्यांना सहजपणे करता येईल अशी श्रीगणेश पूजन पाठवीत आहे श्री गणेश प्राणप्रतिष्ठा साहित्य हळद कुंकू अक्षता गुलाल अष्टगंध ( चंदन पावडर ) अबीर सुपारी १० खारीक५ बदाम५ हळकुंड५ अक्रोड५ ब्लाउज पीस१ कापसाची वस्त्रे (गेजवस्त्र) जानवी जोड २ पंचा१ तांदूळ तुळशी बेल दुर्वा फुले पत्री हार१ आंब्याच्या डहाळी नारळ२ फळे५ विड्याची पाने २५ पंचामृत कलश२ ताह्मण१ संध्या पळी पंचपात्र सुटे रुपये १० नैवेद्याची तयारी समई वाती निरांजन कापूर गणेशाची मूर्ती आदल्या दिवशी आणून ठेवावी.गुरूजी येण्यापूर्वी मूर्ती मखरात ठेवावी,सर्व पूजेचे साहित्य तयार ठेवावे बसण्या साठी आसन किंवा बेडशीट पूजेसंबंधिच्या काही सूचना श्रीगणेशाचे पूजन करताना शुचिर्भूत असावे,घरात वाद विवाद न करता प्रसन्नपणे सर्वांनी एकत्र असावे.पूजा करणारी व्यक्ती यज्ञोपवीत(जानवे) घातलेले असावे. देवास काहीही समर्पण करत असताना ते उजव्या हातानेच वहावे.मूर्ती वर पाणी, पंचामृत, अर्घ्य वाहताना फुलाने किंवा दुर्वांनी वहावे.वडीलधाऱ्यांपैकी एकाने पूजा सांगावी. त्यांच्या पेक्षा लहान व्यक्तीने पूजा करावी 🙏🏻🙏🏻🙏🏻 पार्थिवगणेशपूजा प्रारंभ:- प्रथम कपाळी तिलक धारण करून आचमन करावे देवापुढे पानसुपारीचा विडा ठेवावा देवास नमस्कार करून वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यावेत आणि पुजेला प्रारंभ करावा. खालीलप्रमाणे प्रत्येक देवतेचे स्मरण करून नमस्कार करावा ॐ श्रीमन्महागणपतये नम:॥ ॐइष्ट देवताभ्यो नमः || ॐकुल देवताभ्यो नमः || ॐग्राम देवताभ्यो नमः || ॐवास्तु देवताभ्यो नमः || ॐगुरू देवताभ्यो नम:॥ नंतर हातात अक्षता घेऊन श्रीगणेशाचे मनात स्मरण करावे आणि खालीलप्रमाणे मंत्र म्हणावेत सुमुखश्च एकदंतश्च कपिलो गजकर्णकः|| लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः|| धुम्रकेतुर् गणाध्यक्षो भालचंद्रो गजाननः|| द्वादशैतानि नामानी यःपठेद् शृणुयादपि || विद्यारंभे विवाहेच प्रवेशे निर्गमे तथा || संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते || अक्षता श्रीगणेशाच्या पायांवर वहाव्यात.नंतर उजव्या हातात दोन पळ्या पाणी घेऊन त्यात गंध अक्षता फुले घेऊन खालीलप्रमाणे संकल्प म्हणावा रिकाम्या जागी आपल्या नाव गोत्राचा उच्चार करावा श्रीमद्भगवतो महापुरुषस्य..शालिवाहनशके मन्मथ नामसंवत्सरे, दक्षिणायने, वर्षा ऋतौ, भाद्रपद मासे, शुक्लपक्षे, चतुर्थ्यां तिथौ, बृहस्पति वासरे, स्वाती दिवस नक्षत्रे, तुला स्थिते वर्तमाने चंद्रे, सिंह स्थिते श्रीसूर्ये, सिंह स्थिते श्रीदेवगुरौ, शुभपुण्यतिथौ....॥ मम आत्मन: श्रुतिस्मृति-पुराणोक्त फलप्राप्त्यर्थं श्रीपरमेश्वर प्रीत्यर्थं...........गोत्रोत्पन्नाय ........शर्माणं अहं अस्माकं सकलकुटुंबानां सपरिवाराणां समस्त शुभफल प्राप्त्यर्थं प्रतिवार्षिक विहितं {पार्थिवसिद्धिविनायक} देवता प्रीत्यर्थं यथाज्ञानेन यथामिलित उपचार द्रव्यै: प्राणप्रतिष्ठापन पूर्वक ध्यानआवाहनादि षोडश उपचार पूजन अहं करिष्ये॥ पाणी ताह्मणात सोडावे. पुन्हा पाणी हातात घेऊन खालीलप्रमाणे उच्चार करावा. आदौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपति स्मरणं, शरीर शुद्ध्यर्थं षडंगन्यासं कलश, शंख, घंटा, दीप पूजनं च करिष्ये॥ ताह्मणात पाणी सोडावे.नंतर श्रीगणेशाचे स्मरण करून कलश,शंख,घंटा,दिवा समई यांची पूजा करावी गंध, अक्षता, फुले,हळद कुंकू वहावे ॥प्राणप्रतिष्ठा॥ पुढीलप्रमाणे उच्चार करून मुर्तीच्या नेत्रांना दुर्वांनी तूप लावावे दोन्हीही हातांनी मूर्ती वर छाया करावी अस्यां मृन्मयमूर्तौ प्राणप्रतिष्ठापने विनियोग:॥ ॥ॐ आं -हीं क्रों॥ अं यं रं लं वं शं षं सं हं ळं क्षं अ:॥ क्रों -हीं आं हंस: सोहं॥ अस्यां मूर्तौ १ प्राण २ जीव ३ सर्वेंद्रियाणि वाङ् मन:त्वक् चक्षु श्रोत्र जिव्हा घ्राण पाणि पाद पायूपस्थानि इहैवागत्य सुखं चिरं तिष्ठंतु स्वाहा॥ नमस्कार करून उजवा हात मूर्ती वर ठेवावा डावा हात स्वतःच्या हृदयास स्पर्श करून खालीलप्रमाणे उच्चार करावा गर्भाधानादि षोडष संस्कार सिद्ध्यर्थं षोडष प्रणवावृती: करिष्ये॥ आणि श्रीगणेशास स्पर्श करून मनात १६वेळा "ॐ" म्हणावे नंतर श्रीगणेशाच्या नेत्रांना तूप लावावे. ॐअस्यै प्राणा: प्रतिष्ठंतु अस्यै प्राणा:क्षरंतु च। अस्यै देवत्वमर्चायै मामहेति च कश्चन॥ श्रीगणेशाचे ध्यानं करावे ॐएकदंतं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं। पाशांकुशधरं देवं ध्यायेत्सिद्धिविनायकं॥ श्रीगणेशाच्या पायांवर अक्षता वहाव्यात ॐआवाहयामि विघ्नेश सुरराजार्चितेश्वर। अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थं गणनायक॥ श्रीगणेशास अक्षता वाहून सिंहासन अर्पण करत आहोत अशी कल्पना करावी ॐनानारत्न समायुक्तं कार्तस्वरविभूषितम्। आसनं देवदेवेश प्रीत्यर्थं प्रतिगृह्यताम्॥ श्रीगणेशाच्या चरणांवर दुर्वा किंवा फुलाने पाणी शिंपावे ॐपाद्यं गृहाण देवेश सर्वक्षेमसमर्थ भो। भक्त्या समर्पितं तुभ्यं लोकनाथ नमोस्तु ते॥ श्रीगणेशाच्या चरणांवर गंध फुल अक्षता यांनी युक्त पाणी वहावे ॐनमस्ते देव देवेश नमस्ते धरणीधर। नमस्ते जगदाधार अर्घ्यं न: प्रतिगृह्यताम॥ ताह्मणात ४वेळा पाणी सोडावे ॐकर्पूरवासितं वारि मंदाकिन्या:समाहृतम्। आचम्यतां जगन्नाथ मया दत्तं हि भक्तित:॥ श्रीगणेशाच्या मूर्तीवर पाणी शिंपावे ॐगंगादिसर्वतीर्थेभ्यो मया प्रार्थनया हृतम्। तोयमेतत्सुखस्पर्शं स्नानार्थं प्रतिगृह्यताम्॥ श्रीगणेशाच्या चरणांवर पंचामृत वहावे ॐपंचामृत मयोनीतं पयः दधी घृतं मधु शर्करा सह संयुक्तं स्नानार्थ प्रतिगृह्यताम् श्रीगणेशास शुद्धोदक वहावे ॐश्रीगणेशाय नमः शुद्धोदकं समर्पयामी श्रीगणेशास अक्षता वहाव्यात ॐश्रीगणेशाय नमः सुप्रतिष्ठितमस्तु॥ श्रीगणेशास वस्त्रे वहावीत ॐसर्वभूषाधिके सौम्ये लोकलज्जानिवारणे। मयोपपादिते तुभ्यं वाससी प्रतिगृह्यताम्। श्रीगणेशास यज्ञोपवीत वहावे ॐदेवदेव नमस्तेतु त्राहिमां भवसागरात्। ब्रह्मसूत्रं सोत्तरीयं गृहाण परमेश्वर॥ श्रीगणेशास गंध लावावे ॐश्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरम्। विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यताम्॥ श्रीगणेशास अक्षता वहाव्यात ॐअक्षतास्तंडुला:शुभ्रा:कुंकूमेन विराजिता:। मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वर॥ श्रीगणेशास हळद वहावी ॐहरिद्रा स्वर्णवर्णाभा सर्वसौभाग्यदायिनी। सर्वालंकारमुख्या हि देवि त्वं प्रतिगृह्यताम्॥ श्रीगणेशास कुंकू वहावे ॐहरिद्राचूर्णसंयुक्तं कुंकुमं कामदायकम्। वस्त्रालंकारणं सर्वं देवि त्वं प्रतिगृह्यताम्॥ श्रीगणेशास शेंदूर वहावा ॐउदितारुणसंकाश जपाकुसुमसंनिभम्। सीमंतभूषणार्थाय सिंदूरं प्रतिगृह्यताम्॥ श्रीगणेशास गुलाल अबीर वहावे ॐज्योत्स्नापते नमस्तुभ्यं नमस्ते विश्वरूपिणे। नानापरिमलद्रव्यं गृहाण परमेश्वर॥ श्रीगणेशास फुले,हार,कंठी,दुर्वा वहावे ॐमाल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि वै प्रभो। मया हृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्॥ श्रीगणेशाच्या प्रत्येक अवयवांवर अक्षता वहाव्यात ॥अथ अंग पूजा॥ ॐगणेश्वराय नम:-पादौ पूजयामि॥(पाय) ॐविघ्नराजाय नम:-जानुनी पू०॥(गुडघे) ॐआखुवाहनाय नम:-ऊरू पू०॥(मांड्या) ॐहेरंबाय नम:-कटिं पू०॥ (कंबर) ॐलंबोदराय नम:-उदरं पू०॥ (पोट) ॐगौरीसुताय नम:-स्तनौ पू०॥(स्तन) ॐगणनायकाय नम:- हृदयं पू॥(हृदय) ॐस्थूलकर्णाय नम:-कंठं पू०॥(कंठ) ॐस्कंदाग्रजाय नम:-स्कंधौ पू०॥(खांदे) ॐपाशहस्ताय नम:-हस्तौ पू०॥(हात) ॐगजवक्त्राय नम:-वक्त्रं पू०॥(मुख) ॐविघ्नहत्रे नम:-ललाटं पू०॥(कपाळ) ॐसर्वेश्वराय नम:- शिर:पू०॥(मस्तक) ॐगणाधिपाय नम:-सर्वांगं पूजयामि॥ (सर्वांग) श्रीगणेशास विविध पत्री अर्पण कराव्यात अथ पत्र पूजा:- ॐसुमुखायनम:-मालतीपत्रं समर्पयामि॥(मधुमालती) ॐगणाधिपायनम:-भृंगराजपत्रं॥(माका) ॐउमापुत्रायनम:-बिल्वपत्रं॥(बेल) ॐगजाननायनम:-श्वेतदूर्वापत्रं॥(पांढ-यादूर्वा) ॐलंबोदरायनम:-बदरीपत्रं॥(बोर) ॐहरसूनवेनम:-धत्तूरपत्रं॥(धोत्रा) ॐगजकर्णकायनम:-तुलसीपत्रं॥(तुळस) ॐवक्रतुंडायनम:-शमीपत्रं॥(शमी) ॐगुहाग्रजायनम:-अपामार्गपत्रं॥(आघाडा) ॐएकदंतायनम:-बृहतीपत्रं॥(डोरली) ॐविकटायनम:-करवीरपत्रं॥(कण्हेरी) ॐकपिलायनम:-अर्कपत्रं॥(मांदार) ॐगजदंतायनम:-अर्जुनपत्रं॥(अर्जुनसादडा) ॐविघ्नराजायनम:-विष्णुक्रांतापत्रं॥(विष्णुक्रांत) ॐबटवेनम:-दाडिमपत्रं॥(डाळिंब) ॐसुराग्रजायनम:-देवदारुपत्रं॥(देवदार) ॐभालचंद्रायनम:-मरुपत्रं॥(पांढरा मरवा) ॐहेरंबायनम:-अश्वत्थपत्रं॥(पिंपळ) ॐचतुर्भुजायनम:-जातीपत्रं॥(जाई) ॐविनायकायनम:-केतकीपत्रं॥(केवडा) ॐसर्वेश्वरायनम:-अगस्तिपत्रं॥(अगस्ति) श्रीगणेशास धूप,अगरबत्ती ओवाळावी ॐवनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंधउत्तम:। आघ्रेय:सर्वदेवानां धूपोयं प्रतिगृह्यताम्॥ श्रीगणेशास दीप,निरांजन ओवाळावे ॐआज्यंच वर्तिसंयुक्तं वह्निना योजितं मया। दीपं गृहाण देवेश सर्वक्षेमसमर्थ भो:॥ श्रीगणेशास नैवेद्य,प्रसाद समर्पण करावा ॐशर्कराखंडखद्यानी दधिक्षीरघृतानिच। आहारं भक्ष्यभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम्॥ श्रीगणेशास विडा अर्पण ॐकरावापूगीफलं महद्दिव्यं नागवल्लीदलैर्युतं। कर्पूरैलासमायुक्तं तांबूलं प्रतिगृह्यताम्॥ श्रीगणेशाच्या समोरील विड्यावर दक्षिणा ठेवावी ॐहिरण्यगर्भ गर्भस्थं हेमबीजं विभावसो:। अनंतपुण्यफलद मत:शातिं प्रयच्छ मे॥ श्रीगणेशाच्या समोरील नारळावर पळीभर पाणी सोडावे आणि त्यावर एक फुल वहावे ॐइदं फलं मयादेव स्थापितं पुरतस्तव। तेन मे सुफलावाप्तिर्भवेज्जन्मनि जन्मनि॥ खालीलप्रमाणे श्रीगणेशास दोन-दोन दुर्वा वहाव्यात दूर्वायुग्म पूजा- ॐ गणाधिपायनम:-दूर्वायुग्मं समर्पयामि॥ ॐ उमापुत्रायनम:-दूर्वायुग्मं ०॥ ॐ अघनाशनायनम:-दूर्वायुग्मं ०॥ ॐ विनायकायनम:-दूर्वायुग्मं ०॥ ॐ ईशपुत्रायनम:-दूर्वायुग्मं०॥ ॐ सर्वसिद्धिप्रदायकायनम:-दूर्वायुग्मं ०॥ ॐ एकदंतायनम:-दूर्वायुग्मं ०॥ ॐ इभवक्त्रायनम:-दूर्वायुग्मं ०॥ ॐ आखुवाहनायनम:-दूर्वायुग्मं ०॥ ॐ कुमारगुरवेनम:-दूर्वायुग्मं ०॥ श्रीगणेशाची आरती करावी स्वतः भोवती प्रदक्षिणा करावी ॐयानि कानि च पापानि जन्मांतरकृतानि च। तानि तानि विनश्यंति प्रदक्षिण पदे पदे॥ श्रीगणेशास नमस्कार करावा ॐनमस्ते विघ्नसंहर्त्रे नमस्ते ईप्सितप्रद। नमस्ते देवदेवेश नमस्ते गणनायक॥ श्रीगणेशाची प्रार्थना करावी ॐविनायकगणेशान सर्वदेवनमस्कृत। पार्वतीप्रिय विघ्नेश मम विघ्नान्निवारय॥ एक पळीभर पाणी ताह्मणात सोडावे ॐअनेन मया यथाज्ञानेन कृत पूजनेन तेन श्रीसिद्धिविनायक:प्रीयताम्॥ ||श्रीगणेशार्पणमस्तु|। उद्यापासून सुरू होणा-या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा.... बुद्धीची देवता असलेला गणपतीराया आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो,अशी त्याच्या चरणी प्रार्थना. ॥गणपती बाप्पा मोरया॥🙏 Pages: 1 2 3 4 5 6 श्रीगणेशाची पूजा श्रीगणेशाची पूजा आपल्या सर्वांच्या सोईसाठी श्रीगणेशाची पूजा पाठवीत आहे तरी ज्यांच्या कडे गुरूजी उपलब्ध होत नाहीत त्यांना सहजपणे करता य... Read more »
मराठवाडा मुक्ती संग्राम -मराठवाडा मुक्ती संग्राम - हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान बहादूर नियामुद्दौला निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते . त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता. हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या 1 कोटी 60 लाख होती. यात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा कांही भाग येत होता. मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर अनन्वित अत्याचार सुरु केले. दुसज्या बाजूला मुक्ती संग्राम वेगात सुरु झालेला होता. यांच नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, दिंगबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, विजयेंद्ग काबरा, बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते. मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. मराठवाडयात निजामांच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, मराठवाडयाची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिध्द झालेल्या बदनापूर तालुक्यातील धोपटश्र्वर गावच्या दगडाबाई शेळके, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्गजी जाधव, नळदूर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्हयातील होटी गावचे जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार , विनायकराव चारठाणकर, विश्र्वनाथराव कातनेश्र्वरकर, नांदेड येथील देवरावजी कवळे, जीवनराव बोधनकर आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपज्यात स्वातंत्र्य संग्राम तेजस्वीपणे लढला गेला . या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, जानकीलालजी राठी, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, किशनसिंग राजपूत , गोविंदराव पानसरे, बहिर्जी बापटीकर, राजाभाऊ वाकड, विश्र्वनाथ भिसे, जयंतराव पाटील आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता काम केले. या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोल काढणं शक्य नाही. निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले आहेत हे पाहून 13 सप्टेंबर 1948 रोजी पोलीस ऍक्शन सुरु झाले. मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या. पहाटे 4 वाजता ऑपरेशन सुरु झाल्यावर 2 तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, विजयवाड्याकडील बोनाकल ताब्यात घेतले. चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद तर बुलढाण्याकडेच्या तुकडीने जालना शहर ताब्यात घेतले. दुसरीकडे वरंगल, बीदर विमानतळावर भारतीय फौजांनी हल्ले केले. 15 सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या. तेंव्हा निजामी सैन्य माघार घ्यायला लागले होते हैदराबादचे सेनाप्रमुख जन अल इद्गीस यांनी 17 सप्टेंबर 1948 रोजी शरणांगती स्वीकारली आणि खुद्द निजाम शरण आला. हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला. हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला. हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटीविरुध्दचा लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला. मराठवाडा मुक्तिसंग्रामाला यश प्राप्त होऊन येत्या १७ सप्टेंबर रोजी तब्बल ६० वर्षे पूर्ण होत आहेत. ६० वर्षांपूर्वी १७ सप्टेंबर १९४८ रोजी ‘हैदराबाद पोलीस ऍक्शन’ झाली व हैदराबाद संस्थान देशाचे अविभाज्य अंग झाले. इतकी वर्षे होऊनही मराठवाड्याच्या जनतेच्या मनात अजूनपर्यंत त्याच्या स्मृती जिवंत आहेत. मराठवाडा मुक्तिसंग्रामामुळे स्वातंत्र्याला खर्या अर्थाने पूर्णत्व प्राप्त झाले आहे. अन्यथा हैदराबादचा निजाम ‘स्वतंत्र राष्ट्रा’चे स्वप्न बघत होता. या संग्रामाच्या उज्ज्वल आणि लोकविलक्षण पर्वाच्या आठवणींना उजाळा देताना मुक्ततेनंतर महाराष्ट्रात विलीन होणार्या मराठवाड्याचा कितपत विकास झाला याचाही गांभीर्याने विचार होण्याची आवश्यकता आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम हे हिंदुस्थानी स्वातंत्र्यलढ्यातील एक उज्ज्वल आणि लोकविलक्षण असे पर्व होते. हैदराबादच्या स्वातंत्र्यलढ्याची तुलना स्वातंत्र्यलढ्याच्या कोणत्याही पर्वाशी केली जाऊ शकते, इतका तो गौरवास्पद आहे. असे असूनही या लढ्याकडे उर्वरित जनतेचे फारसे लक्ष जाऊ शकले नाही. कारण हा लढा चालू असताना उर्वरित देश नव्याने जन्मू घातलेल्या स्वातंत्र्याच्या प्रसूती वेदनात पार बुडून गेला होता. १५ ऑगस्ट १९४७ रोजी जरी देश स्वतंत्र झाला तरी हैदराबाद संस्थानच्या रहिवाशांसाठी किंबहुना मराठवाड्याच्या जनतेसाठी स्वातंत्र्याचा खरा जन्म १७ सप्टेंबर १९४८ रोजी झाला. स्वातंत्र्याच्या जवळपास ११ महिने या संस्थानामधील लोक गुलामगिरीतच होते. त्यांच्यासाठी स्वातंत्र्याची पहाट तब्बल ११ महिन्यांनंतर उजाडली. निजामाचा धूर्त डाव होता की, १५ ऑगस्ट १९४७पर्यंत हैदराबाद संस्थान हिंदुस्थानात सामील न करता ‘स्वतंत्र राष्ट्र’ म्हणून घोषित करायचे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी जरी हिंदुस्थान व पाकिस्तान ही दोन राष्ट्रे स्वतंत्र झाली तरी त्या दिवशी कुठेच सामील न झालेले एकमेव संस्थान हे ‘हैदराबाद’ होते. निजामाने २७ ऑगस्ट १९४७ रोजी आपले ‘स्वातंत्र्य’ घोषित केले. तेथील ‘रजाकार’ या दहशतवादी संघटनेने हिंदी जनतेवर अत्याचार सुरू केले. मोठ्या प्रमाणामध्ये दडपशाही सुरू झाली. हैदराबाद सरकारने हिंदुस्थान सरकारबरोबर ‘जैसे थे’ करार केला होता. त्याचा भंग होऊ लागला. त्यामुळे हिंदुस्थान सरकारने १३ सप्टेंबर १९४८ रोजी आपल्या फौजा निजामाच्या राज्यात घुसविल्या. घाबरलेला निजाम शेवटी १७ सप्टेंबर १९४८ रोजी संध्याकाळी ५ वाजता हिंदुस्थानी सैन्याला शरण आला. निजामाच्या डोक्यातील स्वतंत्र राष्ट्राचे मनसुबे भंग पावले. या लष्करी कारवाईला ‘पोलीस ऍक्शन’ असे म्हणतात. सरदार वल्लभभाई पटेल यांच्याद्वारे केली गेलेली ही कारवाई देशाच्या इतिहासात अजरामर ठरली. निजामशाहीचा अंत झाला. तेथील जनता अत्याचाराच्या कचाट्यातून मुक्त झाली. तत्कालीन हैदराबाद संस्थानामध्ये वर्षानुवर्षे मराठवाड्यात राहणारा तेलंगण प्रांत आता आंध्र प्रदेशपासून वेगळे होण्याची भाषा करीत आहे. मराठवाडा, विदर्भ किंवा तेलंगणसारखे स्वतंत्र राज्य कधीच मागणार नाही. मात्र आज एवढ्या वर्षांनंतरही मराठवाडा मागास व विकासापासून वंचितच राहिला आहे हे एक न नाकारता येणारे सत्य आहे. ही विकासाची दरी संपवून मराठवाडा उर्वरित महाराष्ट्राच्या बरोबरीने यायला हवा होता, पण तसे झाले नाही. महाराष्ट्रात विलीन होऊनसुद्धा त्याच्या पदरी उपेक्षाच पडली. गेल्या अनेक वर्षांत मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यांच्यामधील अंतर वाढत गेले. हे अंतर कमी व्हायला हवे. पश्चिम महाराष्ट्रात दरडोई उत्पन्न ६४५ रु. आहे, तर मराठवाड्यात ते फक्त दरडोई ३७५रु. आहे. मराठवाड्याचा खरा विकास कधी होणार ? १ मे १९६० पासून मराठवाडा हा नवीन महाराष्ट्र राज्याचा भाग झाला....६४ व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्या.........! Pages: 1 2 3 4 मराठवाडा मुक्ती संग्राम -मराठवाडा मुक्ती संग्राम - हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान बहादूर नियामुद्दौला निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते . त्... Read more »