Massage

'EduCulture' या शैक्षणिक संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे.....

❬❬ ब्लॉग आवडला तर Like करायला विसरू नका ❭❭

२१ जूनला संध्याकाळी ४ वाजून ५८ मिनिटांनी सूर्याचे दक्षिणायन सुरू झाले. म्हणजे तिथून पुढे सूर्याचे उगवणे आणि मावळणे रोज थोडे थोडे दक्षिणेकडे झुकत चालल्याचे आपल्याला दिसेल. संस्कृतमध्ये अयन म्हणजे विशिष्ट दिशेला जाणे. ज्या काळात सूर्याचे उगवणे, मावळणे दक्षिणेकडे सरकत जाते तो दक्षिणायन काळ! दक्षिणायन २२ डिसेंबरच्या पहाटे ५ वाजून ८ मिनिटांपर्यंत चालू राहील. समजा, आपण उभे आहोत तिथून सूर्याच्या उगवतीच्या जागेपर्यंत २१ जूनला एक रेघ काढली आणि नंतर २२ डिसेंबरला त्याच उभे राहण्याच्या जागेपासून पुन्हा सूर्याच्या उगवतीपर्यंत रेघ काढली तर तो कोन ४७ अंशांचा असेल. याचा अर्थ असा की त्याच्या पलीकडे सूर्य आणखी दक्षिणेला झुकत नाही. तो माघारा वळून पुन्हा उत्तरेकडे सरकू लागेल. म्हणजेच उत्तरायण चालू होईल.
स्वत:भोवती फिरत पृथ्वी सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करते तेवढय़ा काळाला आपण वर्ष म्हणतो. एका वर्षांत २ अयने होतात. दक्षिणायन आणि उत्तरायण. एक अयन साधारण ६ महिन्यांचे असते.

0 comments:

 
Top