दसरा शुभेच्छा
* आपट्याची पाने जुळवतात मने
दस-याच्या प्रेमळ शुभेच्छा
पाठवल्यायत गोड मनाने
स्विकार व्हावा त्याच्या मोठ्या मनाने.
दस-याच्या शुभेच्छा!
*उत्सव आला विजयाचा...
दिवस सोने लुटन्याचा...
नवे जुने विसरुन सारे,
फ़क्त आनंद वाटन्याचा...
तोरण बांधू दारी,
घालू रांगोळ अंगणी.. उधळण सोन्याची,
जपु नाती मना-मनाची विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा
*स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा दसरा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
विजयादशमीच्या शुभेच्छा!
*रम्य सकाळी, किरणे सोनेरी,
सजली दारी तोरणे ही साजीरी,
उमलगे आनंद मनी,
... जल्लोष हा विजयाचा हसरा रम्य उत्सव प्रेमाचा
तुम्हांस सुखसमृद्धी देवो हा दसरा!!
*आपणांस व आपल्या संपुर्ण परिवारास दसरा-विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!
दसरा आणि हिंदू संस्कृती
आश्विन शुद्ध दशमीच्या दिवसाचे महत्त्व हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण असे आहे. पांडवांचा वनवास संपण्याचा जसा हा दिवस मानला जातो,त्याच प्रमाणे दुष्ट रावणाशी प्रभू रामचंद्रांनी निकराचे युद्ध करून त्याचा वध केल्यामुळे राम विजयाचा दिवसही हाच मानला जातो.आदिमाता दुर्गादेवीने नवमी दिवशी अत्याचारी महिषासुराचा वध केल्यामुळे देवीच्या विजयोत्सवाचा दिवस म्हणूनही या दिवसाचे धार्मिक महत्त्व फार मानले जाते. या शुभदिनी आपट्याची पाने लुटून ती सोने म्हणून वाटण्याची प्रथा आहे. या संबंधी एक मनोरंजक कथा आहे.
प्राचीन काळी कौत्स नावाचा एक ब्राह्मण पुत्र वरतंतू ऋषींकडे विद्या संपादन करण्यासाठी गेला. त्याने गुरूंकडून चौदा विद्या संपादन केल्यावर तत्कालीन रीतीनुसार गुरुदक्षिणा मागण्याची त्याने गुरूंना विनंती केली. गुरू काहीही मागेनात. शिष्याने प्रथेनुसार काही तरी मागाच म्हणून गुरूंमागे सारखा लकडा लावला. गुरू संतापले आणि त्यांनी चौदा विद्यांचे अद्यापन मूल्य म्हणून चौदा कोटी सुवर्ण मुद्रा मागितल्या.शिष्य इतके सोने कुठून आणणार? तथापि, गुरूंना दक्षिणा आणून देण्याचे वचन देऊन तो रघुराजाकडे चौदा कोटी मोहरांचे दान मागण्यासाठी गेला.
रघुराजाने नुकतेच विश्वजित यज्ञात सर्व द्रव्य दान केले होते; पण दारी आलेल्या याचकाला रिक्त हस्ते परत पाठविणेही राजाला लांछनास्पद वाटल्यामुळे त्याने इंद्रावर स्वारी करून सोन्याच्या मोहरा मिळविल्याचा इरादा केला. ही गोष्ट इंद्राला समजताच त्याने कुबेराकरवी अयोध्या नगरीबाहेरील आपट्याच्या (शमी) झाडावर सुवर्ण मोहरांचा पाऊस पडला.
त्यामुळे इंद्रावर स्वारी करण्याचा बेत रहित करून राजाने त्या मोहरा कौत्साला दान केल्या. कौत्साने त्या गुरूंना अर्पण केल्या. गुरूंनी मोजून चौदा कोटी मोहराच घेतल्या.उरलेल्या मोहरांचे काय करावे हा पेच निर्माण झाला. दान केलेल्या मोहरा परत घेणे राजालाही शक्य नव्हते. अशा परिस्थितीत कौत्साने त्या मोहरा अयोध्यानगरीतील प्रजेकडून लुटविल्या. याच मोहरांचे प्रतीक म्हणून दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करून शमीची पाने लुटण्याची प्रथा सुरू झाली.
महिषासुराचा वध करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवांच्या शक्तिरूपाने दुर्गादेवीचा अवतार धारण केला, अशी कल्पना रूढ झाल्यामुळे क्षत्रिय लोक देवीच्या या उत्सवात अधिक उत्साहाने भाग घेत असत. दसरा हा पौरुषाचे किंवा वीर वृत्तीचे दर्शन घडविणारा क्षण असल्यामुळे क्षात्र महोत्सव म्हणून हा सन साजरा केला जात असे.विजयादशमीचा हा दिवस वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक सर्वोत्कृष्ट मुहूर्त म्हणून पूर्वीचे राजे आपल्या सैनिकांसह नव्या मुलूखगिरीवर जात असत. आजही कोणतंही नवीन काम या मुहूर्तावर करणं शुभ मानलं जातं.
यामागे धार्मिक कारण तर आहेच, शिवाय मानसशास्त्रीय कारण असं की, या वेळी पावसाळा संपत आल्यामुळे प्रवासात विशेष अडचणी येत नाहीत. सर्व मार्ग खुले झाल्यामुळे बिनधास्तपणे कुठेही जाता येते. गावसीमेत बंदिवान झालेले सर्व मानवप्राणी बंधमुक्त झाल्याने शेतकरीवर्गही खुशीत असतो. सर्वांनाच निसर्गाकडून चालू लागण्याची प्रेरणा व उदंड उत्साह प्राप्त होता. "दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा!'असे उद्गार निघतात ते या अनुकूलते मुळेच.
क्षात्रवृत्तीची जोपासना करण्यासाठी सीमोल्लंघन करण्याचा संदेश देणारा हा सण.आजच्या विज्ञान युगात जुन्या, बुरसटलेल्या विचारांच्या सीमारेषांचे उल्लखंन करण्याची खरी गरज आहे. बदलत्या जगातील ज्ञान प्राप्त करून वैज्ञानिक प्रगती साधण्यात खरा पुरुषार्थ सामावलेला आहे. सतत उद्यमशील राहून, उद्योगाच्या नाना क्षेत्रांत धडाडीने प्रवेश करून स्वतःच्या व पर्यायाने देशाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी धडपडण्यातच क्षात्रतेजाचं खरं दर्शन घडणार आहे.
मानापनाच्या खोट्या कल्पना झुगारून देऊन हुंड्यासारख्या असुरी प्रथा व त्यासाठी स्त्रीचा होणारा अघोरी छळ यातून तिची सुटका करून, तिच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झटण्यातच पुरुष जातीचं खरं कल्याण आहे. शक्तिदेवीच्या उपासनेचा हाच खरा अर्थ आहे. मुलगी होणार म्हणून केली जाणारी भ्रुणहत्त्या थांबविण्यानेच आदिशक्तीची खरी आराधना केल्याचे पुण्य पदरी पडणार आहे. अज्ञान, दारिद्य्र, विषमता, जातीयता,फुटिरता आणि धर्मांधतेचे तट ओलांडून जीवनातील खऱ्या सुखाचं सोनं आपल्याला लुटायच आहे. शमी-आपट्यांच्या पानांच्या प्रतीकातून आज आपल्याला हाच अर्थ अभिप्रेत असला पाहिजे.
शमी
एकवीस पत्रींमध्ये समावेश असणारी शमी गणपती, हरितालिका वगैरेच्या पूजांमध्ये वापरली जातेच, पण शमीचे झाड औषधीसुद्धा असते. शमीचे झाड मध्यम आकाराचे, छोटी छोटी पाने असणारे आणि काटेरी असते. याची पाने वर्षभर हिरवीगार असतात. शमीला शेंगा येतात. प्रत्येक शेंगेमध्ये १० ते १२ बिया असतात. शमीची झाडे जमिनीची सुपीकता वाढवतात म्हणून शेतामध्ये लावण्याची पद्धत आहे. शेंगा कच्च्या असताना त्यांची भाजीही केली जाते. विशेषतः पंजाब, मारवाड वगैरे प्रदेशात ही भाजी करण्याची पद्धत दिसते.
हाती घेतलेल्या कामात यश मिळावे यासाठी शमीच्या झाडाची पूजा केली जाते. काही प्रदेशात दिवाळीच्या दिवशी रात्रभर शमीची पाने भिजवून ठेवलेल्या पाण्याने स्नान करण्याचाही प्रघात दिसतो. आयुर्वेदात शमीच्या झाडाचे गुणधर्म याप्रमाणे सांगितलेले आहेत.
शमी तिक्ता कटुः शीता कषाया रोचनी लघुः।
कफकासभ्रमश्वास-कुष्ठार्शक्रिमिजित् स्मृता ।।
… भावप्रकाश
शमीचे झाड (विशेषतः साल व पाने) कडू, तिखट व तुरट रसाचे, शीतल स्वभावाचे असते. तोंडाला चव नसणे, मूळव्याध, जंत या पचनसंस्थेशी संबंधित विकारांवर शमी उपयोगी असते. तसेच ती रक्तशुद्धिकर असल्याने त्वचाविकारांवर उपयोगी पडते. शमीची पाने भिजत घातलेल्या पाण्याने स्नान करण्यामागे त्वचारोगांचा प्रतिबंध, त्वचारोगांवर उपचार हा हेतू असतो. शमी कफदोषशामक असल्याने खोकला, दमा या त्रासांवरही उपयुक्त असते.
शमीची साल विषघ्न असते, विशेषतः विंचवाच्या दंशावर उतारा म्हणून शमीच्या सालीचा लेप लावण्याचा फायदा होतो. शमी पित्तशामक असल्याने भ्रम म्हणजे चक्कर येत असताही उपयोगी असते. शमीला शिवाफला, ईशानी, शंकरी, मांगल्या, पापनाशिनी अशी पर्यायी नावे आहेत. या पर्यायी नावांवरून शमीची उपयुक्तता लक्षात येऊ शकते. “दोषान् शमयति इति शमी’ अशी शमी शब्दाची व्याख्याही केलेली आहे. अशा प्रकारे दसऱ्याच्या निमित्ताने शमी वृक्षाशी संपर्क यावा हाच हेतू असल्याचे दिसते. पूर्वीच्या काळी जंगलात शमीची अनेक झाडे असत, सध्या मात्र शमीचे पूर्ण वाढ झालेले झाड बघायला मिळणे अवघड होत चालले आहे.
शमी जपणारे खेजरली
वृक्षसंवर्धनासाठी कोणे एके काळी या गावातील लोकांनी केलेल्या बलिदानाची गोष्ट सांगितल्यावर वृक्षसंवधर्ननाचे महत्त्व कोणालाही सहज पटावे. शमीच्या अनेक झाडांचे प्राणपणाने संवर्धन केल्यामुळे जोधपूरजवळील एका गावाला खेजरली असे नाव पडले आहे. राजस्थानमध्ये शमी वृक्षास खेजडी या नावाने संबोधले जाते.दसऱ्याच्या दिवशी तेथे शमी वृक्षाची पूजा करतात.
जोधपूरपासून 25 किलोमीटर दूर अंतरावर खेजरली गाव आहे. गावात मोठ्या आकाराचे व अतिशय प्राचीन (200 वर्षांपेक्षाही जुने) असे खेजडी वृक्ष आढळून येतात. खेजडी अर्थात शमी या वृक्षाचे शास्त्रीय नाव Prosopis cineraria असे आहे.खेजरली गावात प्रामुख्याने विश्नोई समाजाचे लोक राहतात व त्यांचे गुरू श्री जांभेश्वरजी यांनी घालून दिलेल्या 29 नियमांचे कडक पालन करतात. या नियमांपैकी एक प्रमुख नियम वृक्ष व वन्यजीव संरक्षणाचा आहे.
खेजडी वृक्षांबाबतचा खेजरली गावातील इतिहास अत्यंत महत्त्वाचा व स्फूर्तिदायक असा आहे. सन 1730मध्ये जोधपूरचे तत्कालीन महाराज श्री. अभयसिंहजी यांनी त्यांच्या सैन्यास त्यांचा राजवाडा बांधण्यासाठी चुना तयार करता यावा यासाठी खेजरली गावातून झाडे तोडून आणण्याचे फर्माविले. या वृक्षतोडीस स्थानिक विश्नोईंनी विरोध दर्शविला. 84 गावांतील अनेक विश्नोईंनी या महत्त्वाच्या कार्यास सामूहिक पाठिंबा दर्शविला. सैनिक मात्र खेजडीची झाडे तोडण्याबाबत आग्रह धरू लागले. तेव्हा विश्नोई पुरुष व महिलांनी झाडांना चक्क मिठ्या मारल्या व पाहता पाहता 363विश्नोई वृक्षसंवर्धनार्थ धारातीर्थी पडले. त्यानंतर मात्र वृक्षतोड थांबविण्यात आली.
वृक्षसंरक्षणाचे जगातील असे आगळेवेगळे उदाहरण खेजरली या गावामध्ये पाहावयास मिळते. खेजरली येथे "राष्ट्रीय पर्यावरण शहीद स्मारक' आहे. या तीन ते चार एकर क्षेत्रामध्ये भरपूर पक्षी व झाडे आहेत. येथील शमी वृक्ष वाचविण्याच्या लढ्यात धारातीर्थी पडलेल्या अमृताबाईंचे स्मारक पर्यावरण रक्षणाची आणि वृक्षसंवर्धनाची स्फूर्ती देत राहते. आपणही या गावकऱ्यांकडून वृक्षसंवर्धनाची प्रेरणा घ्यायला पाहिजे.
बहुगुणी आपटा
आपट्याचे झाड सर्वांना ऐकून, वाचून माहिती असते, पण फार थोड्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले असते.
दसऱ्याला सोनं म्हणून आपट्यांची पानं वाटायची असतात, याचे ज्ञान सगळ्यांना असते; पण क्वचितच कोणी खऱ्या आपट्याची पाने वाटत असतील! याचे कारण कांचनाच्या विविध जातींशी असलेले त्यांचे साम्य. बिचाऱ्या कांचनाच्या झाडांचे बेसुमार खच्चीकरण, पर्यावरणाची हानी, कचरा समस्या आणि चुकीच्या आणि कालबाह्य समजुतीवर आधारलेली ही घातक प्रथा कमी होत चालली आहे, ती पूर्णपणे बंद होण्याची आवश्यकता आहे. संस्कृतमध्ये "वनराज' म्हणून गौरविला गेलेला हा वृक्ष शततारका नक्षत्राचा आणि कुंभ राशीचा आराध्यवृक्ष मानला गेलाय. दसऱ्याला त्याची रोपे वाटावीत, लागवड करावी, फार तर पूजाही करावी.
आपट्याचे अश्मंतक हे नाव दोन अर्थांनी महत्त्वाचे आहे. अश्मंतक म्हणजे दगडाचा, खडकाचा नाश करणारा. त्याची मुळे जमिनीत खोलवर जातात. खडकाच्या फटीत शिरून वाढतात, कालांतराने फटी मोठ्या होऊन खडक दुभंगतात, अक्षरशः फुटतात! त्यामुळे खडकाळ, मुरमाड, उघड्या, बोडक्या टेकड्यांवर आणि माळांवर वनीकरणासाठी हे एक आदर्श झाड आहे. अश्मंतक याचा दुसरा अर्थ "मूतखडा (किडनी स्टोन) होऊ न देणारा किंवा तो जिरवणारा, मूत्रावाटे बाहेर काढण्यास मदत करणारा होय.' धन्वन्तरी निघण्टूमध्ये आणखी औषधी उपयोग असे दिले आहेत.
अश्मनंतकः कषायस्तु हिमः पित्तकफापहः।
मधुरः शीतसंग्राही दाहतृष्णाप्रमेहजित् ।।
पित्त आणि कफदोषांवर गुणकारी; दाह, तृष्णा आणि प्रमेह यांवर विजय मिळवणारा! साल, पाने, शेंगा आणि बिया औषधात वापरतात.
उपयुक्त आणि टिकाऊ
आपट्याचे लाकूड मजबूत आणि टिकाऊ असते. पण झाडे लहान आणि वेडीवाकडी वाढणारी असल्यामुळे त्याचा उपयोग फक्त शेतीची अवजारे, हत्यारांचे दांडे इ. तयार करण्यासाठी होतो. उष्मांक मूल्य (कॅलॅरिक व्हॅल्यू) भरपूर असल्यामुळे सरपण, इंधन म्हणून ते फारच चांगले असते. त्याच्या राखेमध्ये लोह, चुना, पोटॅश, मॅग्नेशियम, गंधक, सोडियम व स्फुरद इत्यादींची संयुगे असतात. (कृषी ज्ञानकोश खंड 2 रा) त्यामुळे ती खत म्हणून वापरण्यास चांगली असते. जनावरांना, विशेषतः शेळ्यांना याचा पाला पौष्टिक चारा म्हणून उपयोगी पडतो. तंतुमय सालीपासून मजबूत व टिकाऊ दारे बनवतात. पानांचा उपयोग तेंदुपत्तीप्रमाणे बिड्या तयार करण्यासाठीही करतात. गावाच्या सीमेवर आणि शेताच्या बांधावर ही झाडे लावावीत, असे जुन्या ग्रंथात सांगितले आहे. झाडे खूप वर्षे जगणारी, तोडली तरी पुन्हा फुटणारी, मुळे खोल जाणारी असल्यामुळे हद्दी निश्चित राहतात. छोटेखानी झाडांमुळे पिकांना सावलीचा त्रास तर होत नाहीच, उलट जमिनीचा कस वाढविण्यास त्यांचा उपयोग होतो. आपट्याच्या मुळांवर नत्रस्थिरीकरण करण्याच्या करम्याच्या गाठी असतात.
संस्कृतमध्ये आपट्याला कितीतरी नावं आहेत - वनराज, चन्द्रक, आम्लपत्रक, युग्मपत्र, मालुकापर्ण, कुद्दाली इत्यादी. इतर काही भाषांतली नाव अशी ः हिंदी - अष्टा, कचनाल, घिला, झिंझोरी; गुजराती - असुंद्रो ः बंगाली - बनराज, बनराजी; कन्नड - औप्टा, बन्ने, आरेपत्री; तमीळ - अराईवत्ता, आरेका; तेलगू - आरी, आरे. वनस्पतीशास्त्रीय नाव आहे बाउहिनिया रेसिमोसा. बाऊहिनिया हे प्रजातीनाम बाउहिन नावाच्या दोन वनस्पतीशास्त्रज्ञ बंधूच्या स्मरणार्थ दिलं असून कांचनाच्या सर्व जातींचा समावेश त्यात केला जातो. रेसिमोसा म्हणजे विशिष्ट प्रकारचा फुलांचा तुरा येणारे झाड. त्यात फुले देठाकडून टोकाकडे उमलत जाणारी असतात. बहावा, चिंच, गुलमोहर यांच्या कुळातला हा वृक्ष आहे (फॅमिली सिसालपिनेसी).
उन्हाळ्यात फुलणारा आपट्याचा वृक्ष 2 ते 5 मीटर उंच वाढतो, कित्येक वेळा झुडूपवजा आणि वेडावाकडा वाढलेला दिसतो. तो पानझडी असली तरी जास्त पावसाच्या प्रदेशात पानगळ अल्पकाळासाठी होते. बुंधा 5 ते 25 सें.मी.व्यासाच असून साल काळसर तपकिरी रंगाची, खडबडीत, भेगाळलेली दिसते. कात्रज घाटातल्या एका वृक्षाच्या खोडावर मोठे अणकुचीदार काटे पाहायला मिळाले. फांद्यांचे शेंडे बहुधा खाली वाकलेले (ड्रूपिंग) असतात. खोडा- फांद्यांची आंतरसाल गडद गुलाबी दिसते. पाने एकांतरित, साधी, दुभागलेली, लांबीपेक्षा रुंदीला जास्त (2 - 5 ु 3 - 6 सें.मी.), चामट (कोरियारियस) वरच्या बाजूला गुळगुळीत हिरवीगार तर खालच्या बाजूने फिक्कट आणि लवयुक्त असतात. तळापासून निघालेल्या 7 ते 9 शिरा स्पष्ट, उठावदार दिसतात.
फुलण्याचा हंगाम उन्हाळ्यात (मार्च - जून) असून फुलोरे (मांजिऱ्या, रेसीम्स) डहाळ्यांच्या अग्रभागी आणि पानांच्या देठाजवळही येतात. फुले लहान (1 ते 1.5 सें. मी.) हिरवट - पिवळसर - पांढरी, पाच निमुळत्या पाकळ्यांची असतात. कळ्या लांबट, टोकदार दिसतात. पुकेसर 10 असून ते सुटे, सूक्ष्म आणि केसाळ असतात. पावसाळ्यात वीतभर लांबीच्या चपट्या, वाकड्या, हिरव्या शेंगा झाडावर दिसू लागतात, त्या कित्येक महिने झाडावर राहून पुढच्या उन्हाळ्यात पिकून काळ्या होतात. प्रत्येक शेंगेत 12 ते 20 काळ्या, चपट्या लंबगोल बिया असतात. बिया सहजपणे रुजून रोपे तयार होतात.
आपट्याची झाडे भारतात सर्वत्र, अगदी आसेतूहिमाचल पाहायला मिळतात. जंगलात वाढतात आणि लावलीही जातात. पुणे जिल्ह्याच्या मावळ भागात (पर्जन्यमान 1000 ते 2000 मि. मी.) विपुल प्रमाणात झाडं आहेत. बाजी पासलकर जलाशयाच्या काठावरील "इको- व्हिलेज'मध्ये कितीतरी छान वाढलेली झाडे पाहायला मिळतात, तर मध्य प्रदेशातील राजस्थान सीमेवरील राजगढ जिल्ह्यातील निमवाळवंटी प्रदेशातही (पर्जन्यमान 250 ते 500 मिमी) ती मोठ्या संख्येने आढळतात. रोपवाटिकामधून रोपे मिळू शकतात. कोणत्याही हवामानात, कसल्याही प्रकारच्या जमिनीत वाढू शकतात. जमिनीची धूप थांबवण्यासाठी ही झाडे मुद्दाम लावली जातात. त्याच्या मुळांना फुटवे (रूट सकर्स) येतात, त्यांच्या रूपाने शाकीय पुनरुत्पादन घडून येते. अत्यंत उपयोगी, बहुगुणी अशा या वृक्षकाची लाीगवड वनशेती आणि ऊर्जालागवडीसाठी (एकसुरी लागवड टाळून) सर्वत्र आवर्जून करावी. उद्यानात, छोट्या परसबागेत, रस्ता दुभाजकांमध्ये, शेताच्या कुंपणावर आणि बांधावर, कॅनालच्या बाजूने लावण्यासाठी अश्मंतक हा एक उत्तम "वनराज' आहे.
Pages: 1 2 3 4 5 6

0 comments:
Post a Comment