कल चाचणी
महाराष्ट्र
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न राज्यातील सर्व
माध्यमिक शाळांतील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या सर्व
विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय चाचणी (कल चाचणी)
घेण्यात येईल.या माध्यमातून त्यांना उच्च शिक्षण अथवा व्यवसायासाठी योग्य
क्षेत्राची निवड करण्यास सहाय्य करुन आवश्यकतेनुसार वैयक्तिक
मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात येईल.
- सन २०१५-१६ पासून सुरु करण्यात आलेल्या कल चाचणीकरिता वेबसाईट सुरु झालेली आहे
- त्यासाठी प्रत्येक शाळेतील सर्व संगणकांचे ऑनलाईन सर्वेक्षण दिनांक ९ डिसेंबर,२०१५ ते २३ डिसेंबर,२०१५ या कालावधीत करण्यात येणार आहे.
- प्रत्येक शाळेत हे सर्वेक्षण व कलचाचणीची जबाबदारी एका शिक्षकावर सोपविली आहे, त्या शिक्षकाने माहिती भरावी.
उद्देश :१)इयत्ता दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला व्यवसाय मार्गदर्शन सेवेद्वारे शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रांची निवड करण्यास मार्गदर्शन करणे. २) विद्यार्थी व पालक यांना विविध शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रांची माहिती देऊन जाणीव जागृती करणे.
0 comments:
Post a Comment